पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचं संकट राज्यासह संपूर्ण देशावर आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील पोलीस बांधव स्वत:चा जीव धोक्यात घालून दिवसरात्र नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. अशा पोलीस बांधवांसाठी पिंपळे सौदागरमधील शिवराज काटे स्पोर्टस् फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवराज काटे यांनी ‘व्हिटॅमिन-सी’ च्या ३ हजार गोळ्यांचा बॉक्स सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
कोरोना सारख्या संकटात स्वतःची पर्वा न करता नेहमी कर्तव्यदक्ष, २४ तास जनतेच्या रक्षणासाठी तत्परतेने कार्य करणारे पोलीस बांधव अहोरात्र झटत आहेत. शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आजही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व आपल्या परिसरात कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता अहोरात्र ड्यूटी करत आहेत. त्यांच्या या कर्तुत्वाला सलाम. या पोलीस बांधवांच्या प्रकृतीच्या काळजीसाठी ‘व्हिटॅमिन-सी’च्या गोळ्या देण्यात आल्यात. कोरोनामुळे रस्त्यावर उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवाना या गोळ्यांचे वाटप युवानेते शिवराज काटे यांनी केले आहे. शिवराज काटे यांनी केलेल्या या मदतीबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे.




















Join Our Whatsapp Group