भोसरी (Pclive7.com):- चिखली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भोसरी विधानसभेचे आमदार भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या हस्ते आज झाले.
दरवर्षी प्रमाणे २०२१ या नवीन वर्षाचे औचित्य साधून नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज भारतीय जनता पक्ष कार्यालयात पार पडला. यावेळी माजी खासदार अमर साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या वर्षभरात विनायक आबा मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि सोनमताई विनायक (आबा) मोरे (सरचिटणीस- भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, पिंपरी चिंचवड शहर) यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील कार्यक्रमांचा आढावा दिनदर्शिकेत मांडण्यात आला आहे.
यावेळी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वलाताई गावडे, रंजनाताई चिंचवडे, सोनमताई जांभुळकर, मीनाताई बावकर, वैशालीताई मोरे, विद्याताई मोरे, प्रिया मोरे आदी महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
यावेळी स्वीकृत नगरसेवक संतोषभाऊ मोरे, तुकारामभाऊ मोरे, गोरख मोरे, पांडाभाऊ साने, विजय मोरे, मारुती मोरे , रवीशेठ जांभूळकर, दिनेश भालेकर, अतुल बोराटे, दत्ता मोरे, महेश मोरे, सचिन मोरे, शिवा मोरे, विशाल बोरा, सोमनाथ मोरे, विशाल मोरे, बापू आमराळे, गणेश मोरे, अतुल पठाडे, अमोल कदम, अशोक मोरे आदी मित्रपरिवार आवर्जून उपस्थित होते.