पिंपरी (Pclive7.com):- मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्यकारिणीच्या सुचने प्रमाणे तसेच पुणे जिल्हा कोअर कमिटीच्या ठरावा नुसार संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी आज शुक्रवार दिनांक २५ डिसेंबर २०२० या रोजी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकार्यांनी आपआपल्या कुठल्याही स्वरुपात यापुढे पदाचा वापर करु नये. अशा सूचना प्रदेश कार्यकारिणी कडून देण्यात आल्या आहेत.
प्रदेश कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कार्यकर्त्यांच्या समन्वयातून लवकरच नवनियुक्त शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे जिल्हा सचिव विशाल जरे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांच्या सह्या आहेत.