पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड हिंदू खाटीक समाज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आकुर्डी येथील श्री खंडोबा देवस्थान सभागृहात पार पडला. पिंपरी चिंचवड शिवसेनाप्रमुख निलेश तरस यांच्या हस्ते यावेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, माजी नगराध्यक्ष लोणावळा सोमनाथ (नाना) जांभळे, प्रभाकर कांबळे संचालक जनता कल्याण बॅंक, मध्य रेल्वे सल्लागार पुणे संजीव खडके, अध्यक्ष धनकवडी हिंदु खाटीक समाज सचिन जठार, अध्यक्ष लक्ष्मी बाजार प्रतिष्ठान भवानीपेठ सिद्धेश कांबळे अध्यक्ष श्री गंगनाथ महाराज मठ पुणे, व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड हिंदू खाटीक समाज चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था शहरातील हिंदू खाटीक बांधवांसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्याच अनुषंगाने (दि.०६) रोजी आकुर्डी येथील श्री खंडोबा देवस्थान सभागृहात शहरातील समाज बांधव भगिनी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना सर्व निलेश तरस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निलेश तरस यांच्या हस्ते शहरातील सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड हिंदू खाटीक समाज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरपे, उपाध्यक्ष चंद्रकांत थोरात, सचिव सुरेश थोरात, मुख्य सल्लागार मनोहर बागुल यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group