पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशच्या वतीने नवीन वर्षानिमित्त पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदिक तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उन्नती सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय भिसे, डॉ. राणी बाबेल, डॉ ओंकार बाबेल, आनंद हास्य क्लब चेअरमन राजेंद्र जयस्वाल, श्री विठाई मोफत वाचनालयचे उपाध्यक्ष रमेश वाणी, सागर बिरारी, मोहिनी मेटे, यांच्यासह परिसरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंदा भिसे म्हणाल्या, सध्या कोरोना महामारीने नागरिक हैराण आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घेतला. खरे तर शहरात असे शिबीर ठिकठिकाणी आयोजित होणे गरजेचे आहे. कोरोना सारख्या आजारावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक उपचाराची अत्यंत गरजेचे आहे.






















Join Our Whatsapp Group