पिंपरी (Pclive7.com):- महापालिका प्रभाग क्रमांक १४ मधील मोहननगर परिसरात राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाच्या मागे महापालिकेच्यावतीने २ टेनिसकोर्ट उभारण्यात आले आहेत. या टेनिस कोर्टच्या स्थानिक खेळाडू आणि विद्यार्थ्यांना कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे हे टेनिस कोर्ट हटवून तिथे मैदान तयार करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका मीनल यादव आणि शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांनी केली आहे.
याबाबत यादव यांनी महापालिका क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती उत्तम केंदळे यांना निवेदन दिले आहे.
प्रभाग क्रमांक १४ मधील मोहननगर परिसरात पालिकेच्यावतीने २ टेनिसकोर्ट उभारण्यात आले आहेत. या टेनिस कोर्टच्या स्थानिक खेळाडू आणि विद्यार्थ्यांना कोणताही उपयोग होत नाही. या प्रभागात मध्यमवर्गीय कामगार वर्ग तसेच २ ते ३ झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे टेनिस कोर्ट सारख्या महागडा खेळ खेळण्याची स्थानिकांची आर्थिक कुवत नाही.
शिवाय या टेनिस कोर्टचा स्थानिक मुलांना व खेळाडूंना कोणताही उपयोग नाही. सध्या याठिकाणी बाहेरील ५ ते ६ भागातील खेळाडू खेळण्यासाठी येत आहेत. त्यामुळे या जागेचा स्थानिक जनतेला कोणताही उपयोग होत नाही.
त्यामुळे हे टेनिस कोर्ट हटवून त्या ठिकाणी मोकळे मैदान करून देण्यात यावे. त्याचा स्थानिक मुलांना मैदानी खेळ खेळण्यास उपयोग होईल. याबाबत ठराव करुन कार्यवाही करण्याची मागणी यादव यांनी निवेदनात केली आहे.






















Join Our Whatsapp Group