पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील डिप्लोमा कॉलेज ऑफ फार्मसीच्या कु.नेहल देशमुख या विद्यार्थिनींने राज्य स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन फॉर्मा स्लोगन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
ही राज्यस्तरीय स्पर्धा नूतन कॉलेज ऑफ फार्मसी, कवठेमहांकाळ ह्यांनी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस ह्या निमित्ताने आयोजित केली होती.
स्पर्धेसाठी विद्यार्थिनींनी आकर्षक असे चित्र काढून अतिशय सुंदर पद्धतीने घोषवाक्य लिहिले होते. एकूणच मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे, निसर्ग जपायचा असेल तर आपण निसर्गाचा समतोल सांभाळला पाहिजे असा मार्मिक संदेश चित्र आणि घोषवाक्यातून देण्याचा प्रयत्न नेहल देशमुख हिने केला.
या स्पर्धेमध्ये १०० हून अधिक विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. गिफ्ट आणि प्रशस्तीपत्र असे या स्पर्धेचे बक्षीस होते. स्पर्धेकरिता वृषाली पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
ह्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे आणि इतर शिक्षक वृंद ह्यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.