पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात मोठा धक्का बसला आहे. त्यांचे समर्थक युवा पदाधिकारी विशाल वाकडकर आणि विशाल काळभोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आज प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. यावेळी आमदार रोहित पवार तसेच पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे हे देखील उपस्थित होते.
नुकतीच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकांसह शरद पवार यांची भेट घेतली होती. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज अजितदादांचे समर्थक युवा पदाधिकारी विशाल वाकडकर आणि विशाल काळभोर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.