पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील इलास्टिक रन कुरिअर कंपनीच्या स्टॉकमधून २ लाख ७५ हजार रुपयांहून अधिक किमतीचे मोबाइल चोरल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश राम कनमुसे (२०, रा. चिखली) आणि ओमकार विष्णू शिंगाडे (१९, रा. निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी कंपनीचे अधिकारी रजत अभयकुमार वाव्हाळ (२८, रा. वाकड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी १ ते ३१ मे २०२५ या कालावधीत संगनमत करून कंपनीच्या स्टॉकमधील महागडे मोबाइल लंपास केले.

स्टॉक तपासणीदरम्यान मोबाइल गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यात आरोपींचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तपास निगडी पोलिस करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group