पिंपरी (Pclive7.com):- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी सोहळ्याचे कार्यक्रम नियोजन संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे यांनी जाहीर केले. पालखी श्री क्षेत्र देहगाव येथून जेष्ठ कृष्ण सप्तमी मंगळवारी ७ जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे. ९ जुलैला पालखी सोहळा पुण्यात आणि २५ जुलैला पंढरपूर येथे पोहचणार आहे. पालखी सोहळा २९ जुलैला परतीच्या प्रवास करणार असून सोहळयाचा समारोप ११ ऑगस्टला देहूच्या मुख्य मंदिरात होणार आहे. अधिक मास (महीना) असल्याने सोहळा कार्यक्रमाला गत वर्षाच्या १९ दिवसांच्या फरकानंतर प्रारंभ होत आहे.

श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे यांनी पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे, लक्ष्मण मोरे, उमेश मोरे, विश्वस्त गणेश मोरे, वैभव मोरे, दिलीप मोरे यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला. परंपरेनुसार यंदा पालखीचा पुणे येथील नानापेठेतील निवंडुंगा विठ्ठल मंदिरात दोन दिवस मुक्काम वगळता प्रत्येक ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या दरम्यान प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले गोल रिंगण होणार असून इंदापूर, सराटी येथील अकलूज माने विद्यालयाजवळ आणि माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी पादुका आरती येथे भाविकांना उभे रिंगण पहायला मिळणार आहे.

असा असेल प्रवास..
मंगळवारी ७ जुलै रोजी देहूतील मुख्य मंदिरातून पालखी प्रस्थान होणार आहे. पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहगाव येथील इनामदार साहेब वाड्यात, ८ जलैला आकुर्डी येथील विठ्ठलमंदिर, ९, १० तारखेला श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे, ११ जुलै लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिर, १२ जुलै यवत, १३ जुलै वरवंड, १४ जुलै उंडवडी गवळ्याची, १५ जुलै बारामती येथील शारदा विद्यालय, १६ जुलै सणसर, १७ जुलै (बेलवडी येथे गोल रिंगण) निमगाव केतकी, १८ जुलै इंदापूर येथे (गोल रिंगण) इंदापूर, १९ जुलै सराटी, २० जुलै अकलुज (माने विद्यालय येथे गोल रिंगण), २१ जुलै बोरगाव (माळीनगर येथे उभे रिंगण), २२ जुलै पिराची कुरोली (तोंडले बोंडले येथे धावा), २३ जुलै वाखरी तळ (बाजीराव विहिर येथे उभे रिंगण) मुक्काम करणार असून पालखी २४ जुलै रोजी दुपारी एक वाजल्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. रात्री पंढरपूर शहरात श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे. तर २५ जुलैला नगर प्रदक्षिणा करून पालखी २९ जुलै दुपारी एकपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. २९ जुलैला दुपारी पंढरपूर वरून परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार आहे.
परतीचा प्रवास..
पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला २९ जुलै रोजी सुरुवात करणार आहे. ३० जुलै रोजी महाळुंगे माकडाचे, ३१ जुलै रोजी वडापुरी, १ ऑगस्ट रोजी लासुर्णे, २ ऑगस्ट रोजी बहऱ्हाणपूर, ३ ऑगस्ट रोजी हिंगणीगाडा, ४ ऑगस्ट रोजी वरवंड, ५ ऑगस्ट रोजी कुंजीरवाडी फाटा, ६ आणि ७ ऑगस्ट रोजी नवीपेठ पुणे येथील श्री विठ्ठल मंदिर, ८ ऑगस्ट रोजी पिंपरी येथील श्री भैरवनाथ मंदिर, ९ ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र देहूगाव येथे पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.
























Join Our Whatsapp Group