पिंपरी (Pclive7.com):- प्रत्येकाच्या जीवनात तमाशाचा प्रसंग येतोच.. राजकारणातील घडामोडींबाबतीत सोशल मीडियावर आपण व्यक्त होतो. ‘तमाशा लाइव्ह’ हा समाजाचा आरसा दाखवणारा म्युझिकल सिनेमा आहे, असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने व्यक्त केले.
‘तमाशा लाइव्ह’ सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी पिंपरी चिंचवड कॉलेजला सदिच्छा भेट दिली. यावेळी सोनालीने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी ती बोलत होती.
यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव व्ही एस काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई यांच्या वतीने ट्रस्टच्या कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, विद्यार्थी विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण काळे, कला विभाग प्रमुख प्रा. श्रीयश शिंदे, शिवाजी घोडे, लक्ष्मीकांत गुंड, आर्ट सर्कल विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी, व्यवस्थापन व वास्तुविशारद शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
संजय जाधव म्हणाले कि, दुनियादारी सारखेच तरुणांसाठी तमाशा हा सिनेमा बनवला आहे. मी पण केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. मात्र आवड म्हणून सिनेमा क्षेत्रात आलो. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना काय संदेश द्यावा हा मला प्रश्नच पडतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री घुले व स्वरूपा खाटलकर यांनी केले. याप्रसंगी आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पोस्टर तमाशा लाईव्ह कलाकारांना भेट म्हणून दिले. आर्ट सर्कल प्रमुख प्राध्यापक श्रीयश शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.