मुंबई – जीएसटी लागू झाल्यानंतर हॉटेल शौकिनांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. मात्र आता हॉटेलिंगवरचा जीएसटी घटवण्यात आला आहे. त्यानुसार, आजपासून हॉटेलमध्ये केवळ ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. तशा सुचनाही देण्यात आल्या असल्याचे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. ते मुंबई येथे बोलत होते.
यावेळी कोणत्याही हॉटेलचालकाने ५ टक्क्यांहून अधिक जीएसटी आकारल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशार बापट यांनी दिला आहे. एवढेच नाही, तर एमआरपीवर जीएसटी लागू शकत नाही. याकडेही ग्राहकांनी लक्ष द्यावे.’ असेही ते म्हणाले.
यापूर्वी क्लासनुसार हॉटेल्समध्ये वेगवेगळा जीएसटी लावण्यात येत होता. यावर कसलेही बंधन नव्हते. हा जीएसटी साधारणपणे ९ टक्क्यांपासून ते २८ टक्क्यांपर्यंत कितीही लावला जायचा. यावर अनेक स्तरांतून टीकाही झाली. यानंतर अर्थमंत्री जेटलींनी सर्व हॉटेल्सना सरसकट ५ टक्के जीएसटी आकारला जाईल, असे घोषित केले होते.