पिंपरी (Pclive7.com):- आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडची नवीन शहर कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत नवीन ३० सदस्य शहर समितीची निवड करण्यात आली. यात शहर कार्यकारी अध्यक्षपदी चेतन गौतम बेंद्रे आणि अनुप बाबूलाल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.
आपचे राष्ट्रीय सचिव तथा संघटन प्रमुख व खासदार डॉ. संदिप पाठक आणि महाराष्ट्र सह-प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्यातील समितीचे फेररचना करण्यात येत आहे. संदीप पाठक यांनी आपच्या राज्य समिती व सर्व विभागीय समित्या विसर्जित करून जिल्हा समित्या व महानगपालिका क्षेत्रातील शहर समितीच्या माध्यमातून राज्यभर संघटन बांधणीची जबाबदारी दिली असल्याचे आपचे सह-प्रभारी गोपाल इटालिया यांनी जाहीर केले आहे.
आम आदमी पार्टीची पिंपरी चिंचवडमध्ये संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी आणि शहर पातळीवर समिती मध्ये सर्व समाज घटकांना सामावून घेण्यासाठी योग्य प्रकारे आखणी करण्यात आलेली आहे. पुढील 2 आठवड्यात शहरातील 32 प्रभागांमध्ये प्रत्येकी 30 जणांची प्रभाग निहाय समित्या जाहिर करण्यात येणार आहेत अशी माहिती मीडिया प्रमुख स्वप्निल जेवळे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहर समिती मध्ये निवड झालेल्या पदाधिकारी मंडळींची नावे आणि पद खालील प्रमाणे-
1) कार्यकारी अध्यक्ष : चेतन गौतम बेंद्रे / अनुप बाबूलाल शर्मा
2) उपाध्यक्ष : संतोष चंदर इंगळे
3) उपाध्यक्ष : कमलेश गौतम रणावरे
4) उपाध्यक्ष :दत्तात्रय बाळासाहेब काळजे
5) उपाध्यक्ष : स्मिता प्रकाश पवार
6) उपाध्यक्ष : सूर्यकांत अर्जुन सरवदे
7) संघटन मंत्री : ब्रह्मानंद चंद्रकांत जाधव
8) सचिव : डॉ. अमर रमेशचंद्र डोंगरे
9) सहसचिव : इम्रान मुश्ताक खान
10) प्रवक्ता : राज गुलाब चाकणे
11) मीडिया प्रमुख : स्वप्निल चनापा जेवळे
12) सोशल मीडिया प्रमुख : आशुतोष शेळके
13) महिला आघाडी प्रमुख : सीताताई राम केंद्रे
14) युवा आघाडी अध्यक्ष : रविराज बबन काळे
15) विध्यार्थी आघाडी अध्यक्ष : खुशाल काळे
16) शेतकरी आघाडी अध्यक्ष : वाजिद शेख
17) शिक्षक आघाडी अध्यक्ष : ज्योती शिंदे
18) कामगार आघाडी अध्यक्ष : अशोक शेडगे
19)अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष : यशवंत श्रीमंत कांबळे
20) ओ. बी. सी. आघाडी अध्यक्ष : साहेबराब देसले
21) अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष : वहाब अब्दुल मतीन शेख
22) सहकार आघाडी अध्यक्ष : संजय पुडलिक मोरे
23) व्यापारी आघाडी अध्यक्ष : मोहसीन मुसा गडकरी
24) ऑटो ( रिक्षा ) आघाडी अध्यक्ष : रशिद अत्तार
25) क्रीडा आघाडी अध्यक्ष : चंद्रमणी गोविद जावळे
26) लीगलसेल आघाडी अध्यक्ष : सचिन लक्ष्मण पवार
27) सदस्य : यलाप्पा वालदोर
28) सदस्य : सुरेंद्र तुकाराम कांबळे
29) सदस्य : संतोषी नायर