पिंपरी (Pclive7.com):- तीस वर्षापेक्षा अधिक काळ शिक्षण, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या, ग्लोबल चेंज मेकर अवॉर्ड, नॅशनल वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड, पॉप्युलर टीचर अवॉर्ड अश्या विविध पुरस्काराने सन्मानित प्राध्यापक सौ. अरुणा सिलम यांनी पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश केला.

यावेळी बोलताना प्रा. अरुणा सिलम म्हणाल्या की, मी सुद्धा एक शिक्षक आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत आहे. पण दिल्लीमध्ये ज्या प्रकारे प्राथमिक शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेले आहेत. तसे बदल महाराष्ट्रात घडावे म्हणून आणि श्री. अरविंद केजरीवाल यांच्या लोककल्याणकारी योजनानांनी प्रेरित होऊन आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे. असे मत सौ. अरुणा सिलम यांनी केले.
Tags: Aam Aadmi partyAruna SilamChetan BendrePcmc Aam Aadmi Partyप्रा.अरुणा सीलम यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश