पिंपरी (Pclive7.com):- आम आदमी पार्टीच्या वतीने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा पुतळ्याला चपला-बुटाने मारून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले. पाकिस्तान नेहमीच दहशतवद्यांमार्फत भ्याड हल्ले करून भारतातील शांतता भंग करत आहे. काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये चार भारतीय जवानांना आपला जीव गमावावा लागला. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपचे कार्यकर्ते पिंपरी येथे जमले होते. आंदोलनात पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद मुर्दाबाद, वीर जवान अमर रहे! अशा घोषणा दिल्या.
यावेळी कार्यकर्त्यांनी काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या विरमरण आलेल्या चार जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या निषेध आंदोलनाला आपचे चेतन बेंद्रे, राशीद अत्तार, हुसेन शेख, इम्रान खान, स्मिता पवार, अरुणा सिलम, कल्याणी राऊत, सरोज कदम, सीमा बावनकर, सुरेश भिसे, प्रशांत कोलावटे, सतीश नायर, दत्तात्रय काळजे, संतोष इंगळे, सय्यद शेख चाचा, रोहित सरनवबत, गोकुळ नवले, अभिजित सूर्यवंशी, सचिन पवार, स्वप्निल जेवळे, भारत विठ्ठल दास आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.