पिंपरी (Pclive7.com):- पवनामाई उगम तसेच संगम या पवना नदी स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणूनच शनिवार दि.२० रोजी ‘साद पवनेची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी आयोजन केले आहे. यामध्ये रसिकांना ‘संतूर आणि बासरी’ यांची जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे हे पहिले वर्ष असून चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरा शेजारील जिजाऊ उद्यान येथे सायंकाळी सहा वाजता ही जुगलबंदी रंगणार आहे. ही जुगलबंदी पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य संतूर वादक धनंजय दहिठणकर व पं हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य बासरी वादक सुनील अवचट यांच्यामध्ये रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. प्रशांत देशमुख , जिल्हा प्रांतपाल नॉमिनी रो. रवी धोत्रे आणि आनंदी ग्राम संकल्पनेचे सेक्रेटरी रो. दैवशहाणे उपस्थित राहणार आहेत.
गेली तीन महिन्यापासून जी पवनामाईची स्वच्छता चालली आहे. त्याच अभियानाचा एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या संकल्पनेतून तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन व असंख्य जलप्रेमी व निसर्गप्रेमी यांचे प्रमुख सौज्यन्याने आपण पवना माई संगीत महोत्सव या वर्षीपासून सुरू करत आहोत. या अभियानात जास्तीत जास्त जनसमुदाय नदीशी जोडला जावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी या कार्यक्रमालाही विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. तरी रसिक नारिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर यांनी केले आहे.