पिंपरी (Pclive7.com):- भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, संस्थांमध्ये रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर निगडी-प्राधिकरण येथील गुरुकुल नर्सरीतील चिमुकल्यांनी व शिक्षकांनीही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. गुरुकुल नर्सरीत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. हातात तिरंगा घेत येथील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
प्रत्येक लहान मूल हे देशाचे भविष्य आहे त्यामुळे या लहान मुलांना आपल्या देशाची ओळख व्हावी, त्याचप्रमाणे मुलांमध्ये लहानपणापासून देशप्रेमाची बीजे रोवता यावी यासाठी रॅलीचे आयोजन केल्याचं गुरुकुल नर्सरीच्या प्रिन्सिपल हेमांगी वारे यांनी सांगितलं. दरम्यान, रॅलीनंतर लहानग्यांनी एकच जल्लोष केला. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.