केजरीवालांची रवानगी तिहार जेलमध्ये..
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती आणि २८ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडीत पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर ईडीने पुन्हा कोठडी मागितली असता न्यायालयाने त्यांची ईडी कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली होती. आता सोमवारी न्यायालयाने केजरीवालांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना तिहार जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
केजरीवालांकडून या तीन पुस्तकांची मागणी..
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी वकिलाकडून कोठडीत पुस्तके, औषधे, स्पेशल डाएट आणि खुर्ची देण्यासाठी अर्ज केला आहे. केजरीवाल यांनी जेलमध्ये तीन पुस्तके घेऊन जाण्यासाठी मागणी केली आहे. केजरीवाल यांनी भगवदगीता, रामायण आणि प्राईम मिनिस्टर डीसाईड ही तीन पुस्तके वाचण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी अर्ज केला आहे. यामध्ये पत्रकार नीरजा चौधरी लिखित पुस्तक प्राईम मिनिस्टर डिसाईड हे पुस्तक खास आहे. दरम्यान, न्यायालयाने अद्याप याबाबत परवानगी दिलेली नाही.