पिंपरी (Pclive7.com):- खून प्रकरणातील संशयित जेलमधून बाहेर आल्याने टोळक्याने दुचाकी रॅली काढली. ‘हमारा भाई जेल से छुट गया, अभी हम दुश्मन को देख लेंगे’, असे म्हणत १३ जणांनी हातात काठ्या आणि कोयते घेऊन दुचाकी रॅलीमधून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. चिंचवड येथील इंदिरानगरमध्ये शुक्रवारी (दि.३) रात्री ही घटना घडली.
आकाश गणपत चव्हाण (वय २७), आकाश ऊर्फ काकडी सुरेश दांगडे (२७), करण ऊर्फ छोटू अनिल धोत्रे (२२), राहुल ऊर्फ काळ्या नागनाथ कुन्हाडे (२५), सतीश ऊर्फ बांगो बाळू दांगडे (२८), ऋषिकेश गेमू राठोड (२३), महेश ऊर्फ मामू राजू विटकर (२३), अक्षय नेताजी मोरे (२८), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह आकाश मंगळू राठोड (२८), उमेश धर्मा राठोड (२८), राजेश भगवान पवार (२९), महेश मलकाप्पा पुजारी (२८), तुषार बाळू मांजाळकर (३०, सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार आनंद बजबळकर यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी दुचाकीवरून रॅली काढली. हातात लाठ्या, काठ्या व कोयते घेऊन रॅली काढत दुचाकींचे हॉर्न मोठमोठ्याने वाजवून लोकांना शिवीगाळ करून रस्त्याच्या बाजूला होण्यास दमदाटी केली. हातातील काठ्या व कोयते हवेत फिरवून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. त्यांच्या दहशतीला घाबरून लोक भीतीने सैरावैरा पळू लागले होते. या घटनेनंतर पिंपरी पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आठ जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक अतुल शेटे तपास करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group