ढिसाळ आरोग्य यंत्रणा आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात – विशाल वाकडकर
पिंपरी (Pclive7.com):- पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती स्थळ तयार होत आहेत. वाकड, मोशी आणि वाल्हेकरवाडी परिसरात डेंग्यूचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांना रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व गोष्टींकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ बंद करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, युवा नेते विशाल वाकडकर यांनी केली आहे.

डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजार टाळण्यासाठी महापालिकेने पावसाळा सुरू होताच खबरदारीच्या उपाययोजना राबविणे आवश्यक होते. विविध आस्थापनांनी तपासणी करून डासोत्पत्ती स्थळे नष्ट करणे आवश्यक आहे. वेळोवेळी धूर आणि डेंग्यू प्रतिबंध औषध फवारणी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

बांधकामे, विकासकामे, खोदलेले रस्ते यांत पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. त्यात डासांची पैदास वाढल्याने प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या वातावरणातील बदलांमुळे डेंगीबरोबरच विषाणूजन्य आजार म्हणजेच सर्दी, खोकला, ताप याचीही साथ सुरू आहे. अशावेळी नागरिक रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपाच्या विविध रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी पुरेसे खाट उपलब्ध नाहीत.

तसेच रुग्णालयातील डॉक्टर औषध परीचारकांच्या मर्जीतील औषधेच रुग्णांना घेण्यास प्रवृत्त करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यावर मनपा प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कारवाई करायला हवी. या व अशा अन्य मागण्यांबाबत मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी विशाल वाकडकर यांनी केली आहे.
Tags: Vishal wakadkar

























Join Our Whatsapp Group