चिंचवड (Pclive7.com):- गेल्या २४ तासांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे मोडुन पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी स्वतः पाण्यात उतरत मदत कार्य करण्यास सुरुवात केली आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240724-WA0042-300x300.jpg)
नाना काटे म्हणाले की, रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. संपूर्ण चिंचवड मतदार संघातून अनेक फोन येत आहेत. अनेक भागात पाणी साचल्याच्या तसेच झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्याकरिता मी आज सकाळपासूनच घटनास्थळी उपस्थित राहत संपूर्ण चिंचवड मतदारसंघातील पावसाचा आढावा घेत पालिका कर्मचारी, अग्निशामकचे कर्मचारी यांना पाचारण करून मोडलेली झाडे बाजूला काढणे तसेच पाण्याचा योग्य निचरा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
जर पावसाचा जोर कमी नाही झाला तर वाकड, चिंचवड या नदीकाठच्या गावाची अवस्था बिघडू शकते. याची पूर्वकल्पना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना लवकरच फोन द्वारे कळवून आवश्यक त्या यंत्रणा पुरवण्यात याव्यात अशी विनंती करणार असल्याचे नाना काटे यांनी म्हटले आहे.