पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून पवना धरण जलाशय आज दिनांक २५ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता ७२ टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार पवना धरणातून कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240724-WA0042-300x300.jpg)
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)