पिंपरी Pclive7.com):- ऑटो क्लस्टर समोरील बीआरटी मार्गात बीएमडब्ल्यू कार आणि स्कूलबसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून बीएमडब्ल्यू कारचे आणि बसच मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ऑटो क्लस्टर समोरील बीआरटी मार्गात बीएमडब्ल्यू कार आणि पोद्दार स्कूलची बस यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. यावेळेस स्कूल बस मध्ये १५ विद्यार्थी प्रवास करत होते. त्यातील तीन विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत तर बीएमडब्ल्यू कार चे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.