चिंचवड (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस यांची शिष्टाई आणि दोन्ही बाजूंकडील त्यांची ‘समन्वयक’ म्हणून भूमिका फळास आली असून, गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या माळवले नगर, किवळे येथील सर्व्हे नं- ७५/२ ब मधील रस्ता हा प्लॉट धारकांसाठी खुला करण्यात आला आहे. नियोजित डीपी रस्त्याला सदर रस्ता हा जोडला जाणार असून, त्याचा फायदा २३ प्लॉटधारकांना होणार आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
याबाबत शेतकरी उत्तम तरस आणि प्लॉट धारकांच्या वतीने आंदोलन करणारे फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मराज तंतरपाळे, राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या यांच्यामध्ये योग्य चर्चा आणि समनव्य साधून, प्लॉटधारकांसाठी आणि भूमिपुत्र शेतकरी उत्तम तरस यांच्यासाठी शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस हे एकप्रकारे ‘संकटमोचक’ ठरले आहे.
प्लॉटधारकांनी रस्ता खुला करण्याबाबत निलेश तरस यांच्याकडे धाव घेतल्यानंतर, निलेश तरस यांनी चर्चेचा मार्ग खुला ठेवताना रोहिदास तरस यांच्या माध्यमातून प्लॉटधारक आणि शेतकरी यांच्यात थेट संवाद घडवून आणला. त्यामुळे कोणताही तंटा न होता समस्या सुटण्यास मदत झाली. समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याने निलेश तरस यांच्या शिष्टाईचे किवळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.