चिंचवड (Pclive7.com):- पुनावळे येथे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या ब्रेस्ट कन्सर तपासणी शिबीरामध्ये खुप चांगला प्रतिसाद मिळाला. परिसरातील २१२ महिलांनी या तपासणी शिबिरामध्ये तपासणी करून घेतली. सर्व महिलांना लागलीच रिपोर्ट ही देण्यात आले.
यावेळी राहुल कलाटे यांनी स्वतः शिबिराला भेट देऊन उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रस्ते, ऑक्सिजन पार्क, फ्लाय ओव्हर, बीआरटी रोड याबाबत त्यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. उपस्थित महिलांच्या अडचणी राहुल कलाटे यांनी जाणून घेतल्या व त्या स्वतः लक्ष घालून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सागर शिंदे, रोहन जाधव व सनी वाघमारे यांनी विशेष सहकार्य केले.
या संपूर्ण शिबीरामध्ये परिसरातील महिलांपर्यंत सर्व माहिती पोहोचविणे आणि त्यांचे रजिस्ट्रेशन करून घेण्याचे काम सोसायटीतील सौ. पुर्वाताई बोंडे-ठाकरे यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले. शिवाय दिवसभर शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून महिलांना मदत करणे, नोंद करणे, इतर नियोजन डॉक्टरांना मदत करणे हे काम सौ. दिपा शेट्टी मॅडम व सौ. पुर्वा मॅडम यांनी केले. तसेच सौ. वनिता लकडे मॅडम, सौ. नित्या मॅडम, शिखा गुप्ता यांनी ही मदत केली. याशिवाय संपूर्ण फेडरेशनच्या सर्व सदस्यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मदत केली. फेडरेशन सचिव शिवराज हराळे, फेडरेशन सदस्य मनिष जठार, फेडरेशन सदस्य अश्विन सुतार, प्रॉपर्टी मॅनेजर श्री. अतुल कुलकर्णी, श्री. अभिजीत जाधव, सुहास, विशाल व हाऊस किपिंग स्टाफ यांनीही मदत केली.