भोसरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेते अजित गव्हाणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय भालेकर युथ फाउंडेशन यांच्या वतीने आप्पा भानसे शिक्षण संस्था, न्यु एंजल्स इंग्लिश स्कुल व नवमहाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रूपीनगर, तळवडे. या ठिकाणी मोफत संगणक संच भेट स्वरूपात देण्यात आला.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240731-WA0028-300x225.jpg)
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, संजय नेवाळे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, माजी नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे, कामगार नेते विष्णुपंत नेवाळे, रवींद्र सोनवणे, हनीफ मुल्ला, जावेद पठाण, समीर मुल्ला, सुखदेव आप्पा नरळे, नितीन बोंडे, प्रवीण राजपूत, रहीम शेख, राहुल पवार, शरद भालेकर, गणेश मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)