पिंपरी (Pclive7.com):- पुणे- सातारा – कोल्हापूर- सांगली – सोलापुर वासियांचा आज शनिवार (दि.१७) आकुर्डी येथील खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी ५ वाजता कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी इ.१० वी व १२ वी मधील यशस्वी विद्यार्थी तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात समाजोपयोगी उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेह मेळावा संपन्न होणार आहे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार समाधान अवताडे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते सातारा भूषण, सांगली भूषण, कोल्हापूर भूषण, सोलापूर भूषण या पुरस्कारांचे वितरण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण स्मारक समिती, सातारा जिल्हा मित्र मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच, साकोसां वर वधू सुचक केंद्र, साकोसां ज्येष्ठ नागरिक संघ, पश्चिम महाराष्ट्र महिला मंडळ, पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर युवक संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.