भाऊसाहेब भोईर यांच्यावतीने रविवारी या सुरेल कार्यक्रमाचे चिंचवडमध्ये आयोजन; पिंपरी चिंचवडमध्ये होणार इंडिया बुक रेकॉर्ड
चिंचवड (Pclive7.com):- प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच १३० गाण्यांचे सलग १५ तास गायन करून पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने त्यांना एक खास सुरेल भेट देण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
येत्या ८ सप्टेंबरला प्रख्यात गायिका आशा भोसले ह्या ९१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि वॉल्टझ म्युझिक अकादमी यांच्या वतीनं १ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.
चिंचवड मधील एल्प्रो सिटी मॉल च्या ऑडिटोरियम मध्ये सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरवात होईल. गायिका द्रिष्टी बलानी ह्या १५ कलाकारांसह नॉन स्टॉप १५ तास आशा भोसले यांनी गायलेली १३० गाणी सादर करतील. हा कार्यक्रम सर्व संगीतप्रेमी रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे, असे भाऊसाहेब यांच्या वतीनं देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.