पिंपरी (Pclive7.com):- निगडीमधील वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे स्मारक आहे. पुतळ्याला असणारे महाराणा प्रताप यांचे अस्त्र भाला हे काही अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले. हा झालेला प्रकार खूप निंदनीय असल्याने राजपूत समाजाच्या वतीने महाराणा स्मारक येथे संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनाबाहेर मूक आंदोलन करण्यात आले.

यावेळी राजपूत संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार बायस, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सचिन काळभोर, श्रीराम परदेशी, नेताजी सिंह राजपूत, अशोक इंगळे, गणेश राजपूत, राजेंद्र सिंह राठौड, प्रवीण राजपूत, चतुर्भुज चव्हाण, माउली जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी निगडी प्राधिकरण परिसरातील पुतळा परिसरामध्ये सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
तातडीने बसवला भाला..
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा भाला चोरीस गेला होता. तो लगेच नव्याने महापालिकेच्या वतीने बसवण्यात आला. त्याचप्रमाणे उद्यानातील किरकोळ दुरुस्तीचे कामसुद्धा केले जाईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.