चिंचवड (Pclive7.com):- नुकत्याच झालेल्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेबाबत राज्यभर हाहाकार व्यक्त होत असून याबाबत संबंधित जबाबदारांना कडक शासन व्हावे आणि सरकारने जबाबदार मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, माफी मागावी अशीच जनसामान्यांची भावना आहे असे सांगत आज रहाटणी येथील शिवछत्रपती स्मारकाजवळ युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी निषेधाच्या घोषणा देत झालेल्या घटने प्रति तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कला व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या प्रतिमा फाडून त्या पायदळी तुडवून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी काही सामान्य नागरिकांनी या आंदोलनात स्व: सहभाग घेऊन या नेत्यांच्या प्रतिमा जोडे मारण्याची भूमिका घेतली.
याप्रसंगी नरेंद्र बनसोडे, कौस्तुभ नवले, भरत वाल्हेकर, रवी नांगरे, स्वप्निल बनसोडे, जितेंद्र छाब्रा, उमेश खंदारे, सुप्रिया पोहरे, निखिल भोईर, हरीश डोळस, बी आर माडगूळकर यांनी निषेध व्यक्त केले.
दुर्घटनेला जबाबदार भाजप सरकारचा धिक्कार असो, माफी मांगो माफी मांगो भाजप सरकार माफी मांगो, दुर्घटनेला जबाबदार मंत्र्यांनी राजीनामे दिलेच पाहिजे, दुर्घटनेला जबाबदार मुजोर सरकारचा धिक्कार असो, दुर्घटनेला जबाबदार नालायक सरकारचा निषेध असो, दुर्घटनेला जबाबदार निर्लज्ज सरकारचा निषेध असो, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, अजित पवार मुर्दाबाद, रवींद्र चव्हाण मुर्दाबाद, सुधीर मुनगंटीवार मुर्दाबाद, नारायण राणे मुर्दाबाद अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून टाकला.






















Join Our Whatsapp Group