काळेवाडी (Pclive7.com):- संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काळेवाडी येथे अभिवादन करण्यात आले. सेना महाराजांना वंदन करण्यासाठी संत सेना युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी गणेशपूजन, आरती पाठोपाठ लिंबच मातेचे पूजन आणि आरती करण्यात आली. तसेच सेना महाराजांना पुष्प वहन व नमन करून कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम रात्री ८ ते साधारणतः मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालला. पिंपरी चिंचवड, पुणे, चाकण परिसरातील समाजाच्या कार्यकर्त्यांनी याप्रसंगी उपस्थिती नोंदवली व एकत्रितपणे मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पूर्ण केला. सर्व संत सेना युवा मंचच्या युवक कार्यकर्त्यांचा कौतुकास्पद कामामुळे कार्यक्रम सुरळीत व आनंदात पार पडला.

यावेळी संत सेना युवा मंचचे अध्यक्ष प्रवीण अमलथेकर, उपाध्यक्ष किरण साळुंखे, कोषाध्यक्ष गणेश जाधव, सहसचिव दिलीप सोनवणे, सचिव मयूर सोनवणे, प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे, सदस्य चेतन पवार, चेतन सोनवणे, तुषार सोनवणे, युवराज सोनवणे, प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.