सुलभा उबाळे यांचा पुढाकार, शिवसैनिकांचा उत्स्फुर्त सहभाग
भोसरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा रामभाऊ उबाळे यांच्या संकल्पतनेतून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी युवा सेना शहरप्रमुख अजिंक्य उबाळे यांनी पुढाकार घेतला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील तळवडे, रुपीनगर, नेहरूनगर, दिघी, रुपीनगर, ताम्हणे वस्ती, घरकुल वसाहत, इंद्रायणीनगर, नेहरूनगर आदी भागांमधून या रक्तदान शिबिराला नागरिकांचा सहभाग लाभला. माजी नगरसेवक शशी गवळी, शहर संघटक राहुल गवळी, तुकाराम वारंग, गणेश इंगवले, जेष्ठ शिवसैनिक शिवाजी शेळके, ढमाले काका, भारती चकवे, कावेरी परदेशी, शशिकला उभे, दमयंती गायकवाड, निर्मला पाटील युवासेनेचे अजिंक्य उबाळे, विशाल उबाळे, अमित शिंदे, अनिकेत येरूनकर, अभिषेक सुरवसे, शुभम महाडिक, सुहास तळेकर, अभिजीत गिरी, किशोर शिंदे, आणि आजी माजी पदाधिकारी व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या, शिवसेनेच्या वतीने नेहमीच विधायक उपक्रम हाती घेतले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून विक्रमी रक्त संकलन करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. यापुढेही असेच विधायक उपक्रम आयोजित करण्याचा मानस आहे.