पिंपरी (Pclive7.com):- मोशीतील लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ तसेच समाज मेळावा नुकताच पार पडला. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, चंद्रकांत अमृतकार, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अमोल वाणी व बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल सोनजे, नीलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, चंद्रकांत अमृतकार यांनी समाजबांधवांच्या पाल्यांसाठी लखपती योजनेची माहिती दिली. यामध्ये त्यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे व वाचनाचे महत्त्व, मोबाईलचे दुष्परिणाम तसेच सद्यःस्थितीत पालकांची जबाबदारीचे महत्त्व स्पष्ट केले. मान्यवरांच्या हस्ते संकल्प लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उद्योजक किशोर ब्राम्हणकार यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अतुल फुलदेवरे यांची निवड करण्यात आली. भूषण सोनजे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सचिव कुणाल पिंगळे, स्वप्नील कोतकर, खजिनदार स्वप्नील नानकर, स्वप्नील मुसळे, तेजस येवला, वर्षा वाणी व मनिषा येवला आदींनी परिश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group