बीड (Pclive7.com):- लग्नात वधू किंवा वराची पादत्राणे लपवून त्यांच्याकडून बक्षीस घेण्याची प्रथा आहे. मात्र एका लग्नात बूट लपवण्यावरून झालेल्या वादात चक्क नवरदेवाचेच डोके फुटल्याची घटना घडली आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंबेफळ गावात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला.
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील लग्नात नवरदेवाचा बूट लुपवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हा विषय गंमतीत सोडून देण्याऐवजी याचे वादात रुपांतर झाल्याने २ गटात तुफान हाणामारी झाली. त्यामुळे नवरीकडील मंडळीने चिडून नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळींना खोलीत कोंडून चांगलीच मारहाण केली. यात नवरदेवाचे डोके फुटल्याने तो जखमी झाला. शेवटी मध्यस्थी करून कसेबसे हे प्रकरण मिटवण्यात आले. तर जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर झालेले लग्न मोडण्यात आले आहे.