
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून चिंचवड गावातील एका नायट्रो जिममध्ये जात होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी जीममध्ये व्यायाम केला. त्यानंतर ते एका ठिकाणी बसले आणि त्यांनी पाणी प्यायलं. मात्र, काही सेकंदांतच त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. यावेळी जीममध्ये असलेल्यांनी या प्रकारानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. मिलिंद कुलकर्णी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मिलिंद कुलकर्णी यांच्या पत्नी स्वतः एक डॉक्टर आहेत. तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या बनली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी पूर्ण आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. योग्य काळजी आणि तपासणी करूनच कोणताही व्यायामाला सुरूवात करणे गरजेचे आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

























Join Our Whatsapp Group