पिंपरी (Pclive7.com):- सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता, पिंपळे निलख, डी. पी रोड, विशालनगर, हॉटेल रंगला पंजाब शेजारील मैदानावर महिला भगिनींसाठी “न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक सचिन साठे सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, पुणे मनपा च्या माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ, सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना शत्रुघ्न काटे, सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे व बालगायिका, टीव्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास मानाच्या पैठणी सह रोख १,११,१११/- रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. क्रांतीनाना मळेगांवकर हे वतीने न्यू होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे सादरीकरण करतील.
विजेत्या स्पर्धकांना द्वितीय क्रमांक रुपये ५१,१११/- रोख व मानाची पैठणी, तृतीय क्रमांक रुपये ३१,१११/- रोख व मानाची पैठणी तसेच ५ लकी ड्रॉ विजेत्यांना प्रत्येकी ११,१११/- रोख व आकर्षक साडी देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच उपस्थित प्रत्येक महिला भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक साडी भेट देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा समारोप रात्री ९ ते ११ या वेळेत स्नेहभोजन देण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक सचिन साठे सोशल फाऊंडेशन च्या वतीने प्रसिद्धीस दिली आहे.
























Join Our Whatsapp Group