पिंपरी (Pclive7.com):- उसने दिलेले दीड लाख रुपये परत मागितल्याने संतापलेल्या शेजाऱ्याने एका महिलेला स्टीलच्या कड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे रविवार (दि. २६) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

सुनील शंकर धुनघव (४२, रा. लांडेवाडी, विठ्ठलनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने रविवारी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेने आरोपीने उसने घेतलेले दीड लाख

रुपये परत मागितले, या कारणावरून संतापलेल्या आरोपी सुनील याने शिवीगाळ करून हातातील स्टीलच्या कड्याने महिलेच्या डोक्यावर आणि नाकावर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाली आहे.
























Join Our Whatsapp Group