पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात येत्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मशीन आणि आवश्यक साहित्याचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांमधून एकूण 2067 मतदान केंद्रांसाठी 7162 ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले आहे.

हे साहित्य घेऊन निवडणूक कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तासह मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्यात आल्या असून मतदान सुरळीत आणि पारदर्शक पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील 128 जागांसाठी तब्बल 692 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group