पिंपरी (Pclive7.com):- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी–चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी एन बी ही नवीन मालिका लवकरच सुरू होत आहे. आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक चारचाकी वाहनांसाठी तीनपट शुल्क भरून राखीव ठेवण्यासाठी अर्ज 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत स्वीकारले जातील. दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षक क्रमांकाकरिता अर्ज 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत स्वीकारले जातील.

चारचाकीची यादी 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी 21 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दोष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

तसेच दुचाकीची यादी 22 जानेवारी 2026 रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. व त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
अर्जासोबत डीडी, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पॅनकार्ड व आधारकार्ड-लिंक मोबाईल क्रमांकाच्या साक्षांकित प्रती आवश्यक असून डीडी “DY RTO, Pimpri-Chinchwad” या नावाने राष्ट्रीय, अनुसूचित बँकेचा असावा. एकदा राखून ठेवलेला राखीव क्रमांक बदलता येणार नाही. राखीव क्रमांकानंतर 180 दिवसांत वाहन नोंदणी न केल्यास क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.






















Join Our Whatsapp Group