आळंदी (Pclive7.com):- षट्तिला एकादशी व मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आणि भव्य फुलांची सजावट करण्यात आली आहे. देशी व विदेशी अशा विविध रंगीबेरंगी आणि सुगंधी फुलांनी मंदिर परिसर सजवण्यात आला असून संपूर्ण समाधी मंदिर भक्तिमय वातावरणाने नटले आहे.

माऊलींच्या मुखवट्याला विशेष आकर्षक स्वरूप देण्यात आले असून फुलांची सुंदर आरास, नवीन वस्त्रे आणि सुबक सजावटीमुळे माऊलींचे रूप अत्यंत मनोहारी दिसत आहे. मंदिरात प्रवेश करताच फुलांचा सुगंध आणि रंगसंगती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सकाळपासूनच माऊलींच्या दर्शनासाठी आळंदी नगरीत भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून “ज्ञानोबा माऊली”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. या पवित्र दिवशी माऊलींचे हे अलौकिक रूप पाहण्यासाठी राज्यासह देश-विदेशातून भाविक दाखल झाले आहेत.
षट्तिला एकादशी व संक्रांतीनिमित्त झालेल्या या भव्य सजावटीमुळे आळंदी नगरीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
























Join Our Whatsapp Group