पिंपरी (Pclive7.com):- जर्मनी येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर वर्ल्ड शूटिंग स्पर्धेत भारतासाठी रौप्यपदक पटकावत देशाचा मान उंचावणारी मुळशी तालुक्याची कन्या तथा विश्वविजेती नेमबाज कु. शौर्या दिलीप भरणे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेविका व शिक्षण समिती सदस्य श्रुती वाकडकर तसेच भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर यांनी शौर्या भरणे व तिच्या कुटुंबीयांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. उपस्थित मान्यवरांनी तिच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना श्रुती वाकडकर यांनी सांगितले की, “कु. शौर्या भरणे हिने आपल्या अथक परिश्रम, शिस्त, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. तिचे यश हे केवळ मुळशी तालुक्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब असून नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे.”

रामभाऊ वाकडकर यांनीही शौर्याच्या यशाचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. भविष्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी अधिकाधिक पदके जिंकून देशाचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शौर्या भरणे हिच्या कुटुंबीयांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.




















Join Our Whatsapp Group