पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. श्वेता रोकडे असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या दोन मैत्रिणींसोबत रावेत येथील सेलेस्टीयल सिटी सोसायटीमध्ये भाड्याने राहत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या डॉ. श्वेता यांना उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांनी सांगितले की, मृत महिलेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या, अपघात अथवा अन्य कोणतीही शक्यता नाकारता येत नसल्याने सर्व अंगांनी तपास सुरू आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रावेत पोलीस पुढील तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group