भोसरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ प्रसारक मंडळाच्या वतीने “अजितदादा आणि महाराष्ट्र : वारसा, कार्य आणि भविष्य” या विषयावर भव्य परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता राजमाता जिजाऊ महाविद्यालय मैदान, लांडेवाडी, भोसरी येथे संपन्न होणार आहे.

परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार व संपादक संजय आवटे, कमलेश सुतार, प्रसन्न जोशी, राहुल कुलकर्णी, निलेश खरे हे सहभागी होणार असून न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी विलास बडे हे संवादक म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्व. अजितदादा पवार यांच्या राजकीय, सामाजिक व विकासात्मक कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचा आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील वाटचालीचा वेध या परिसंवादातून घेतला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून नगरसेवक विराज लांडे, माजी नगरसेवक विक्रांत लांडे आणि हे कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय भूमिका बजावत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक, युवा वर्ग, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group