परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- निगडी प्राधिकरण, रावेत आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला व पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत नियोजित कचरा डेपो आणि ‘वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट’ला नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या प्रकल्पाविरोधात जनजागृती आणि आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज (शनिवार, २४ ऑक्टोबर) नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

निगडी प्राधिकरणातील दुर्गादेवी टेकडीवर प्रस्तावित कचरा डेपो आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक एकत्र येत असून, आगामी आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न..
प्रस्तावित कचरा डेपोमुळे निगडी, रावेत आणि परिसरातील नागरिकांना प्रदूषण, दुर्गंधी तसेच आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करत नागरिकांनी एकत्र येऊन विरोध करण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीत प्रकल्पाविरोधात जनजागृती करणे, नागरिकांची भूमिका स्पष्ट करणे आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे यावर चर्चा होणार आहे.

बैठकीचे ठिकाण आणि वेळ..
नियोजित कचरा डेपोविरोधातील नागरिकांची बैठक आज (दि.२४) सायंकाळी ५.३० वाजता निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील मनोहर वाढोकर सभागृहात होणार आहे. निगडी प्राधिकरण, रावेत आणि परिसरातील सर्व नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी आणि प्रस्तावित प्रकल्पाविरोधातील जनजागृती व आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘चला, आपल्या टेकडीचे रक्षण करूया!’ या संदेशासह नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group