पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकताच वाकडमधील विकासकामांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समिती सभापती ममताताई गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड तसेच संबधित विभागाचे अधिकारी, परिसरातील नागरिकही उपस्थित होते.
आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी वाकड परिसरातील वेणुनगर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी होणाऱ्या विरंगुळा केंद्राची पाहणी केली. वेणुनगर येथे होत असलेल्या लिनिअर गार्डनची देखील पाहणी करण्यात आली. नागरिकांची गरज व इतर मागण्या लक्षात घेऊन त्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. दत्तमंदिर रोडवरील विविध अतिक्रमण व अनधिकृत पथारीवर कारवाई करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी संबंधित विभागास सूचना केल्या. तसेच पालाश सोसायटी समोरील रोडमधील अडचण ठरणाऱ्या विहीरी संदर्भात आयुक्तांनी यासंबंधी संबंधित जागामालक यांच्याशी चर्चा करून हा रस्ता पूर्ण होण्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.