पिंपरी (Pclive7.com):- वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापल्याप्रकरणी शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा मुळशी तालुक्याचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. २८) हिंजवडी पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२६) चांदेरे यांचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या राहत्या घराजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांसमोर चांदेरे यांनी तलवारीने केक कापला. त्याची व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्याने त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group