पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवारी (दि.२८) मध्यरात्री दोन ज्वेलर्सच्या दुकानामध्ये चोरट्यांनी चोरी करुन लाखोंचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरुनगरमध्ये चोरट्यांनी ममता ज्वेलर्स नावाचे दुकानाचे शटर उचकटून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेले. दुकानात असलेले लॉकर चोरट्यांना तोडता न आल्याने त्यामधील दागिने चोरट्यांना चोरता आले नाहीत. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या घटनेत किती रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला हे अद्याप समजू शकले नाही.
दुसऱ्या घटनेत निगडी गावठाणातील ज्वेलर्सचे दुकानात चोरट्यांनी चोरी केली. दुकानेच शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला आहे. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.






















Join Our Whatsapp Group