पिंपरी (Pclive7.com):- विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी ठेवा.पालकांनो आपल्या मुलाला आवड कोणती आहे हे बघा. तुमच्या अपेक्षांचे ओझे लादू नका, असे मत भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी भोसरी येथे व्यक्त केले.
शिवसेनेच्या ५३ व्या भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात वर्धापनदिनानिमित्त शिवसेना भोसरी विधानसभा व महाराष्ट्र मजदूर संघटना महासंघ आयोजित दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभ शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष इरफान सय्यद, अरुण गिरे, राम गावडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे, धनंजय आल्हाट, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, पिंपरी चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर, वेदश्री काळे, कल्पना पालांडे, जिल्हा संघटिका आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, कोणती ही गोष्ट अशक्य नाही. विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टीची माहिती हवी असेल त्यांना महाराष्ट्र मजदूर संघटना कार्यालायचे दार उघडे आहे. हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी कायम मदतीसाठी तत्पर राहील.
उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, आता स्पर्धा खूप वाढली आहे. आपल्या मुलांचे करिअर आपल्या हातात आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना मानसिक दबाव आणू नये. त्यांच्या कलेने घ्यावे.
यावेळी प्रा. विलास वाळके व अँड. रोहित अकोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना भोसरी विधानसभा महाराष्ट्र मजदूर संघटना महासंघाने केले होते.






















Join Our Whatsapp Group