पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही व्यापारी संघाच्या प्रभारी प्रदेश सचिवपदी आशिष हरिहर वाळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवशाही व्यापारीसंघ शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश संघटक रविकिरण घटकार यांच्या सुचनेने व प्रदेश सदस्य रोहीत विभुत्ते यांच्या अनुमोदनाने वाळके यांच्या निवडीची घोषणा केली आहे. शिवसेना शाखा तापकीरनगर या ठिकाणी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
यावेळी खजिनदार नवनाथ माऊली जाधव, प्रदेश संघटक रविकिरण घटकार, प्रदेश सदस्य रोहीत विभुत्ते, निलेश भोरे, मारूती मस्के, गणेश पाडुळे, प्रसिध्दीप्रमुख दत्ता गिरी, आदींनी आशिष वाळके यांना पेढा भरवून आभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त प्रदेश सचिव आशिष वाळके यांनी व्यापारी वर्ग व सर्वसामान्य जनतेची तसेच दिव्यांग, विधवा माता भगिंनीची अखंड सेवा करून शिवशाही व्यापारीसंघा बरोबर शिवसेना वाढीसाठी कटिबद्द राहण्याच्या सुचना युवराज दाखले यांनी देऊन पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.






















Join Our Whatsapp Group