
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघासाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यात अंबर चिंचवडे यांना यश आले आहे. अंबर चिंचवडे यांच्या आपला महासंघ पॅनलने चुरशीच्या लढतीत बाजी मारत महासंघावर आपली सत्ता मिळवली आहे.

न्यायालयाच्या आदेशाने शनिवारी (दि.११ रोजी) झालेल्या मतदानाचे निकाल रात्री उशिरा हाती आले असून महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या स्व.शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. बबन झिंजुर्डे यांचे महासंघावरील गेल्या १५ वर्षातील वर्चस्व अखेर आज संपुष्ठात आले आहे. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत महापालिका कर्मचाऱ्यांनी आज परिवर्तन घडवून आणले. तर या परिवर्तनाच्या विजयाचे अंबर चिंचवडे हे शिल्पकार ठरले आहेत.
शनिवारी झालेल्या या निवडणूकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त समीर चव्हाण, मुजावर कादर व वरिष्ठ लिपिक सावंत यांनी काम पाहिले. या निवडणुकीत एकूण ६९८९ मतदानापैकी ५५३३ कामगारांनी मतदानात भाग घेतला. आज सकाळी ७ ते सांयकाळी ४ पर्यंत उत्स्फूर्त झालेल्या मतदानात ८१.४१ टक्के मतदान झाले होते.
(सविस्तर निकालाची आकडेवारी थोड्याच वेळात)






















Join Our Whatsapp Group